आमच्याबद्दल

पार्श्वनाथ अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, हिंगोली ही महाराष्ट्रातील एक नोंदणीकृत व मान्यताप्राप्त सामाजिक संस्था आहे, जी सामाजिक समरसता, शैक्षणिक प्रगती, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, युवक विकास, पर्यावरण संवर्धन आणि अल्पसंख्यांक कल्याण यासाठी कटिबद्ध आहे. संस्थेची स्थापना सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक परिवर्तनाच्या उद्देशाने झाली. संस्था विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रीय असून समाजातील दुर्बल, उपेक्षित आणि अल्पसंख्यांक घटकांपर्यंत पोहोचून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करते. आमचा विश्वास आहे की समाज बदलायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे — आणि ही संधी आम्ही विविध उपक्रमांद्वारे उपलब्ध करून देतो.

आमचे ध्येय

समाजासाठी, समाजाबरोबर या तत्त्वावर काम करत, आम्ही एक सशक्त, आत्मनिर्भर व समता निष्ठ समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहतो. पार्श्वनाथ संस्था ही केवळ एक संस्था नाही, तर एक चळवळ आहे — गरजूंना न्याय, शिक्षण, आरोग्य व संधी मिळवून देण्यासाठी अविरत कार्य करणारी

📜 स्थापनेचा इतिहास:

पार्श्वनाथ अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना हिंगोली जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक व अल्पसंख्यांक समुदायाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने काही तरुण सेवाभावी कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने करण्यात आली. समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत मूलभूत सेवा पोहोचविणे, शिक्षणाची गंगा घराघरात नेणे व अल्पसंख्यांक समाजाचा हक्काचा आवाज शासनदरबारी पोहोचवणे या उद्देशाने संस्था कार्यरत झाली. संस्थेचा आधार भगवान पार्श्वनाथांच्या अहिंसा, करूणा व समभावाच्या तत्त्वांवर आधारित आहे. या तत्त्वांच्या प्रेरणेने संस्था समाजसेवेचे कार्य सातत्याने करत आहे.

🌟 मूलतत्त्वे

🌟
मूलतत्त्वे

अहिंसा व समभाव

सर्व धर्म व जातींमध्ये समता व बंधुभाव.

शैक्षणिक प्रगती

शिक्षण हेच खरे साधन.

न्याय व हक्क

दुर्बल घटकांच्या हक्कासाठी प्रयत्न.

सेवा हीच साधना

कोणतीही जात, धर्म न पाहता सेवा.

स्वावलंबन

युवकांना कौशल्ये देणे.

🎯 उद्दिष्टे

अल्पसंख्यांक समाजासाठी शैक्षणिक संस्था, वसतिगृहे, वाचनालये स्थापन करणे.
महिलांसाठी बचत गट, प्रशिक्षण केंद्रे व सक्षमीकरण प्रकल्प राबवणे.
गरीब, अनाथ, अपंग व मानसिक रुग्णांसाठी सेवा प्रकल्प उभारणे.
आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे व सामाजिक जनजागृती उपक्रम राबवणे.
पर्यावरण पूरक उपक्रम जसे की वृक्षारोपण, स्वच्छता अभियान राबवणे.
शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण .